। अहिल्यानगर । दि.08 जानेवारी 2025 । शहराचा विकास, बेरोजगारी, शिक्षण व्यापार या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या नगर पुणे शटल इंटरसिटी रेल्वेसाठी शिवसेना युवा सेनेचे राज्यसहसचिव विक्रम राठोड यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातले.
मुंबई येथे मंत्रालयात त्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. यावेळी आमदार रोहित पवार हे देखील त्यांच्यासोबत होते. दोघांनी या प्रश्नाविषयी त्यांच्याशी चर्चा केली. प्रश्न लवकरात लवकर सोडून. रेल्वेमंत्रांची संपर्क साधू. असे आश्वासन दोघांनी यावेळी दिले.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शहराच्या दृष्टीने अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेला व अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरु होण्यासाठी आम्ही वारंवार सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक- यांची भेट घेऊन निवेदन दिले.
मागील 14 वर्षापासून 40 हजार पेक्षा जास्त नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन रेल्वे विभागाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सध्या दौंडमध्ये कॉर्ड लाईन, विद्युतिकरण आणि रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे.
शटल ट्रेनसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे. इतकेच नव्हे तर लहान तालुका असलेल्या दौडमधून पुण्यासाठी एक दैनंदिन शटल ट्रेन आहे. नगर हा एक प्रमुख स्थान असून भारतातील एक मोठे आर्मी बेस आहे. अहिल्यानगर व पुणे दरम्यान दररोज 20 हजार हून अधिक प्रवासी प्रवास करतात,
तर आठवड्याच्या शेवटी ही संख्या 40 हजार पर्यंत पोहोचते. अहिल्यानगर-पुणे दैनंदिन इंटरसिटी ट्रेनमुळे इंधन बचत, प्रदूषण आणि अपघात कमी होतील. दररोज 20,000 पेक्षा अधिक प्रवासी या सोयीचा लाभ घेऊ शकतील. नागरिकांसह सेना दल, रेल्वे पोलिस यांनाही याचा फायदा होईल.रेल्वे उत्पन्नात वाढ होईल, दरवर्षी सुमारे 5 कोटी रुपये मिळू शकणार.
अहिल्यानगर येथून सकाळी 6:00 वाजता शटल ट्रेन आणि पुण्याहून सायंकाळी 6:30 वाजता अहिल्यानगरकडे इंटरसिटी ट्रेन चालवावी, पर्यायी सर्व पैसेंजर गाड्या बंद असल्याने पुणे- निजामाबाद आणि दौंड-नांदेड या दोन डेमू रेल्वेला प्रत्यक स्थानकावर थांबा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
त्यामुळे लवकरात लवकर आष्टी नगर-दौंड क्वाडलाईन-पुणे-मुंबई रेल्वे चालू करावी अशी विनंती राठोड यांनी केली आहे. आष्टी-नगर-पुणे-मुंबई रेल्वे शटल एक्स्प्रेस सुरु करण्यात यावी अशी मागणी युवा सेनेचे राज्यसहसचिव विक्रम राठोड यांनी केली आहे. ही मागणी करण्यात आली आहे. यावेळी दिलदारसिंघ बीर, मुन्ना भिंगारदिवे, नरेश भालेराव, महेश शेळके, विशाल गायकवाड आदि मंडळी उपस्थित होते.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग