। नवी दिल्ली । 02 जानेवारी 2025 । केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून गुरूवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, 2024 च्या ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकर, जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश, हॉकीपटू हरमनप्रीत सिंग आणि पॅरा अथलीट प्रवीण कुमार या चार क्रीडापटूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
हे पुरस्कार दि.17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
क्रीडा मंत्रालयाने सांगितले की, क्रीडा पुरस्कारांसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशींचे परीक्षण आणि तपासणी केल्यानंतर सरकारने खेळाडू आणि प्रशिक्षकांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. विविध समित्यांनी केलेल्या शिफारशींच्या आधारे सरकारने मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग आणि पॅरा थलीट प्रवीण कुमार यांना खेलरत्नने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.