। पुणे । दि.04 जानेवारी 2025 । बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील तीन आरोपी गेल्या काही दिवसांपासून फरार होते, अखेर या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी शनिवारी बेड्या ठोकल्या. तर यातील तिसरा आरोपी अजूनही फरार आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच यांच्या हत्या प्रकरणात घडामोडींना वेग आला आहे.
सुदर्शन घुल आणि सुधीर सांगळे या दोघांना बेड्या ठोकल्या असून, तिसरा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार असल्याचे समोर आले आहे. तसंच सरपंच संतोष देशमुख यांचं लोकेशन देणाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
26 वर्षीय सुदर्शन घुले याच्यावर 10 वर्षात 10 गुन्हे दाखल आहेत. केज पोलिसात तब्बल 8 गुन्हे दाखल आहेत. मारहाण, चोरी, अपहरण, खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि फूस लावून पळवल्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तर 22 वर्षीय सुधीर सांगळे याच्यावर आवादा कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा आहे.