इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याचे आयोजन
। अहिल्यानगर । दि.18 जानेवारी 2025 । अहिल्यानगर राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने राष्ट्रीय सुरक्षा महिलना अंतर्गत तारकपूर आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे आयेजन करण्यात आले होते. दि.1 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियाना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग
या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून फॅक्टरी इन्स्पेक्टर योगेश पाटील, प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेचे नरेश भाई, यंत्र अभियंता चालकचे अविनाश साखरे, सांख्यिकी अधिकारी श्रीमती मयुरी दिकोंडा, आदी सह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यंत्र अभियंता अविनाश साखरे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिप प्रज्वलन व मोहिमेच्या बॅनर चे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग
यावेळी उत्कृष्ट केपिटिएल आणणारे चालक व उत्तम कामगिरी करणारे कार्यशाळा कर्मचारी यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे नरेश भाई, योगेश पाटील यांनी इंधन बचतीबाबत तसेच सुरक्षितता मोहिमेअंतर्गत उपस्थिताना मार्गदर्शन केले.
अविनाश साखरे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आगार व्यवस्थापक चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराते वाहतूक नियंत्रक यांनी केले. कार्यक्रमावेळी आगारातील पर्यवेक्षक, प्रशासकीय कर्मचारी, चालक - वाहक, कार्यशाळा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग
अभियानात विविध कार्यक्रम
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने घेतलेल्या निर्णयनुसार संपुर्ण देशात दरवर्षी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना, 1 जानेवारी 2025 पासून साजरा करण्यात येतो. प्रशांमध्ये सुरक्षित प्रवासाबद्दल विश्वास वृध्दींगत करणे, कर्मचार्यांच्या मनामध्ये सुरक्षित प्रवासी वाहतुकीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, अपघात होणार याची काळजी घेणे आदी महत्त्वाचे उद्देश आहेत.