। मुंबई । दि.04 जानेवारी 2024 । राज्यात लाडकी बहिण योजना सुपरहीट ठरली. यानंतर काही तक्रारी देखील झाल्या. यावरुन आता नियमबाह्यपणे अर्ज बद होणार असल्याची माहिती समोर येत आहे. माजी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना स्पष्ट केले. यावरुन आता किती महिलांना पैसे मिळणार आणि किती महिलांना पैसे मिळणार नाही हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छानणी होणार असं तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. वर्धा, पालघर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवरून तक्रारी आल्याचं कारण सांगितलं जात आहे. ही पडळताळणी तक्रारनिहाय केली जाणार असल्याचं देखील आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.
यानिमित्ताने केशरी आणि पिवळ कार्ड वगळता सगळ्या अर्जांची पडताळणी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा फायदा महायुतीला झाला. पुन्हा सत्तेत आल्यानंतर 2100 रुपये देऊ असे आश्वासन दिले गेले. मात्र आता छाननी होवून किती महिला या योजनेमधून वगळल्या जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.