। अहिल्यानगर । दि.03 जानेवारी 2025 । साईभक्त व प्रसिद्ध अभिनेता सोनु सुद यांनी माध्यान्ह आरतीकरीता उपस्थित राहुन शिर्डी येथील श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
अभिनेता सोनु सुद हा निस्सीम साईभक्त असून तो गेल्या 22 वर्षांपासून शिर्डीत साई दर्शनाला येत असतात. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर तसंच आगामी चित्रपटाच्या यशासाठी सोनू सूद शिर्डीत साई दरबारी आले होते.
यावेळी आगामी 10 जानेवारीला प्रदर्शित होणार्या फतेह चित्रपटाच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना केली. यावेळी सोनू यानं फतेह नाव लिहिलेला काळ्या रंगाचा टी शर्ट देखील परिधान केलेला होता.
दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.
Tags:
Ahmednagar