राज्यात ठिकठिकाणी इनोव्हेशन हब विकसित करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने आढावा
। मुंबई । दि.04 जानेवारी 2024 । राज्यांतील तरूणांमध्ये कौशल्य विकास करीत असताना त्यांच्या मध्ये नाविन्यता विकासासाठी ठिकठिकाणी इनोव्हेशन हब विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, विभागामार्फत अल्प कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत एक लाख दहा हजार युवकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये अद्यावत प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून प्रशिक्षण क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी नियोजन करा. औद्योगिक आस्थापनांचा सहयोग वृध्दिंगत करण्यात येणार आहे. स्टार्टअप सहाय्य योजनेतून महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.विभागाच्या योजनांसाठी आवश्यक निधी देण्यात येणार आहे. कुशल महाराष्ट्र रोजगारयुक्त महाराष्ट्र तयार करण्यात येणार असल्याचे, श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
बैठकीस कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल, अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव गणेश पाटील, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग