। मुंबई । दि.16 जानेवारी 2025 । बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री 2 च्या सुमारास वांद्रे पश्चिम येथील सद्गुरु सरण इमारतीतील त्याच्या राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अभिनेत्याच्या घरात एका अज्ञात चोराने घुसखोरी करत त्याच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला आहे.
सैफ अली खानच्या मानेवर धारदार शस्त्राची 10 सेमीची जखम झाली आहे. तसेच, त्याच्या हातावर आणि पाठीवर देखील काही जखमा झाल्या असल्याची माहिती समजली आहे. ‘सैफ अली खानच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
Tags:
Breaking