हायड्रोजन पेरॉक्साइड ने भरलेला टँकर उलटला


। अहिल्यानगर श्रीगोंदा । दि.08 जानेवारी 2025 । श्रीगोंदा तालुक्यातून जाणार्‍या नगर -दौंड महामार्गावर चिखली घाटामध्ये गुजरात वरुन कुरकुंभ कडे निघालेल्या तीस हजार लिटरने भरलेल्या हायड्रोजन पेरॉक्साइड या केमिकलचा टँकर घाटात सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पलटी झाला.

ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे  पलटी झालेल्या टँकर मधून गॅस गळती होऊ लागली. बेलवंडी पोलीस स्टेशनला कळविल्या वर कुरकुभं येथे कंपनी अधिकार्‍यांशी पोलीस स्टेशनच्या वतीने संपर्क साधला.

कुरकुंभ येथून तातडीने रेस्क्यू टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन क्रेनचा अवलंब करून टँकर सरळ करण्याचा प्रयत्न केला व टँकर मधून होणारी हायड्रोजन पेरॉक्साइड ची गळती थांबविली.

यावेळी कोळगावचे मंडल अधिकारी गिरीश गायकवाड यांनी सांगितले की  दुसर्‍या दिवशी सदर कंपनीच्या वतीने दुसरा टँकर बोलावून त्यामध्ये अपघात रस्ता टँकर मधील गॅसची रिफिलिंग केली जाणार आहे.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  

Post a Comment

Previous Post Next Post