नगरच्या सायबर पोलिसांची कल्याणमध्ये कारवाई

नगरच्या सायबर पोलिसांची कल्याणमध्ये कारवाई

25 लाखाची लॉटरी लागल्याचे सांगून फसविणारा आरोपी गजाआड

। अहिल्यानगर । दि.08 जानेवारी 2025 । कोण बनेगा करोडपतीमधून बोलतोय, तुम्हाला 25 लाखाची लॉटरी लागली आहे, असे सांगून एकास फसविणार्‍या आरोपीस सायबर पोलिसांनी अटक केली आहे. फैसल इकबाल मेमन (रा. मेमन मंजिलवाली पीर रोड, कल्याण, ठाणे) असे आरोपीचे नाव आहे. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबरचे पोलीस निरीक्षक मोरेश्‍वर पेंदाम, उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलीस अंमलदार अभिजीत अरकल, मल्लिकाअर्जुन बनकर, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, अरुण सांगळे, महिला अंमलदार सविता खताळ, दीपाली घोडके यांनी केली आहे.

फिर्यादी नारायण अरुणे (रा. रामवाडी, सर्जेपुरा) यांचा दि.20 ऑगस्ट 2021 ते दि.10 मार्च 2022 पर्यंत अनोळखी मोबाईल नंबरवरुन व्हॉटसऍप कॉलवरुन कॉल करुन विश्‍वास संपादन केला. वेगवेगळ्या प्रोसेसिंग फीच्या नावाखाली फोन पे अकांऊटवर ऑनलाईन पैसे पाठविण्यास भाग पाडून 1,33,200 रुपयांची फसवणूक केली आहे. 

याप्रकरणी सायबर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयाच्या तपासात आरोपीचा मोबाईल नंबर, बँक अकांऊटवरुन आरोपी फैसल इकबाल मेमन असल्याचे निष्पन्न झाले. कल्याण, ठाणे येथे आरोपीचा शोध घेतला असता, तो मिळून आला नाही. त्यानंतर सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्‍लेषणाव्दारे आरोपीचा शोध घेतला असता, तो मिळून आल्याने त्यास अटक करण्यात आले.  

कोण बनेगा करोडपतीमधून 25 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे, क्रेडिट कार्ड ऍक्टीव्हेशन करुन देतो, ऑनलाईन केवायसी अपडेट करुन देतो, पेट्रोल पंप एजन्सी देतो, ट्रेडिंग ऍप डाऊनलोड करुन जास्त प्रमाणामध्ये परतावा देतो, अशर वेगवेगळया आमिषाला नागरिकांनी बळी पडु नये. प्रत्येक अनोळखी व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी. तसेच कोणत्याही प्रकारे आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार करावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  

 

Post a Comment

Previous Post Next Post