अहिल्यानगरमध्ये दंडात्मक कारवाई


।अहिल्यानगर । 02 जानेवारी 2025। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडलेल्या जिल्ह्यातील 138 तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. दारू प्राशन करून वाहन चालवू नये असे आवाहन जिल्हा पोलिसांकडून करण्यात आले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून ड्रंक अँड ड्राइव्ह’ करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. जिल्हा पोलिसांनी 41 ठिकाणी केलेल्या नाकाबंदीत एकुण 138 जण सापडले.

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 31 डिसेंबरच्या रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी रस्त्यांवर होणाऱ्या गोंधळाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालवणे, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेटचा वापर न करणे, विनापरवाना गाडी चालवणे आणि रस्त्यावर धिंगाणा घालणे यासारख्या नियमभंग करणाऱ्या 250 वाहनचालकांवर कारवाई केली. या कारवाईत एकूण 2 लाख 8 हजार 550 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.


सात महिन्यापासून पसार आरोपी जेरबंद 

राज्य उत्पादनची मोठी कारवाई... 

मद्यधुंद बस चालकाने 30-40 वाहनांना चिरडले 

 

Post a Comment

Previous Post Next Post