अहिल्यानगर मध्ये सोळावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन 9 फेब्रुवारी रोजी

। अहिल्यानगर । दि.18 जानेवारी 2025  सोळावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन अहिल्यानगर येथील कोहिनूर मंगल कार्यालयात शनिवार व रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी प्रसिद्ध साहित्यिक डॉ.संजीवनी तडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. अशी माहिती शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे व  कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे यांनी दिली.

नवोदितांना  प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या 20 वर्षापासून साहित्यिक उपक्रम राबविण्यात येतात, आज पर्यंत झालेल्या 15 साहित्य संमेलनामधून जवळपास 30,000 व्यक्ती सहभागी झालेल्या होत्या. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने होणाऱ्या सोळाव्या शब्दगंध साहित्य संमेलनात साहित्य दिंडी, उद्घाटन, सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद, चर्चासत्र, काव्यसंमेलन, गझल सादरीकरण, कथाकथन, पारितोषिक वितरण व समारोप असा भरगच्च कार्यक्रम राहणार आहे. अशी माहिती शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली.

सर्व कार्यक्रमांमध्ये युवक, युवतीं  तसेच महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्या दृष्टीने कथालेखन स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा व निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सामाजिक,साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रज्ञावंतांना पुरस्कारही देण्यात येणार आहेत.वाड:मय स्पर्धेकरिता 457 पुस्तके होती, त्याचे परीक्षण समितीने केलेले आहे.दोन ज्येष्ठ साहित्यिकांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. संमेलनाचे नियोजन करण्यासाठी महत्त्वाची बैठक शुक्रवार दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी दुपारी चार वाजता आयोजित करण्यात येत आहे.

तरी या संमेलनात जास्तीत जास्त नवोदितांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सचिव सुनील गोसावी, खजिनदार भगवान राऊत, कार्यवाह भारत गाडेकर,राज्य संघटक प्रा. डॉ. अशोक कानडे, उपाध्यक्ष प्राचार्य जी.पी.ढाकणे,श्रीमती जयश्री झरेकर, डॉ. तुकाराम गोंदकर, डॉ. अनिल गर्जे, स्वाती ठुबे,राजेंद्र फंड, बबनराव गिरी, सुभाष सोनवणे, शिरीष जाधव, अरुण आहेर, शर्मिला गोसावी, राजेंद्र पवार, रवींद्र दानापुरे, प्रशांत सूर्यवंशी यांनी केले आहे.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग 

Post a Comment

Previous Post Next Post