राज्य उत्पादनची मोठी कारवाई ; चार वाहनांसह मुद्देमाल जप्त


। अहिल्यानगर । दि.  29  डिसेंबर  2024  । जामखेड तालुक्यात विविध ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाडी टाकल्या. या कारवाईत 31 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

यामध्ये जामखेड मधील प्रतिष्ठित समजले जाणार्‍या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला  असल्याची माहिती समोर येत आहे. जामखेड हद्दीत अवैध दारू वाहतूक व विक्रीच्या अनुषंगाने गस्त घालत असताना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने अरणगाव, श्रीगोंदा रोड वरील एच.पी. पोट्रोल पंपाजवळ पाळत ठेवली होती.

या ठिकाणी स्कॉर्पिओ आणि स्विफ्ट या दोन वाहनांवर छापा मारुन गोवा बनावटीच्या अँडीरियल व्हिस्कीचे 27 बॉक्स व वरील दोन वाहनासह 16,72,720 रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या गुन्ह्याच्या पुढील तपासकामी लोणारवाडी हद्दीत, भैरवनाथ मंदिराजवळ, ता.परांडा, जि. धाराशिव या ठिकाणी छापा मारुन चारचाकी वाहन व स्विफ्टसह अँडरीयल व्हिस्कीचे 18 बॉक्स असा अंदाजे 14,50,480 रुपये किंमतीचा मुददेमाल रिकव्हरी पंचनाम्याखाली जप्त करुन दोन इसमाविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक नरेंद्र थोरात करत आहेत.
 

Post a Comment

Previous Post Next Post