केंद्रीय मंत्री पियुष गोयल शनी चरणी लिन

। अहिल्यानगर  । सोनई । दि. 28 डिसेंबर 2024 । केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी (दि.27) दुपारी शनिशिंगणापूर येथे शनी देवाचे सहकुटुंब दर्शन घेतले. ते मुंबई येथून खासगी विमानाने शिर्डीत आले. तेथे साईबाबांचे दर्शन घेतले.

 त्यानंतर शनिशिंगणापूर येथे दाखल झाले. पोलिस बंदोबस्त शेवगाव येथील उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक खगेन्द्र टेभेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय माळी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दर्शनाने मनस्वी आनंद, समाधान झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी बोलताना मंत्री गोयल म्हणाले, भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाला लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला महाराष्ट्रात यश मिळालं. त्याबद्दल तमाम जनतेचे आभार. शेती निगडित असलेले उद्योगधंदे हा महत्त्वाचा घटक मानून केंद्रात भरीव तरतूद करू असेही ते यावेळी म्हणाले.

शनिशिंगणापूर देवस्थानच्या वतीने कोषाध्यक्ष दीपक दरंदले, योगेश बानकर, पोलीस पाटील सयराम बानकर, रमेश डोळे, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय बिराजदार आदी उपस्थित होते. जनसंपर्क कार्यालयात चहा घेत सर्वांशी त्यांनी आस्थेने चर्चा केली. परिसराची माहिती जाणून घेतली. कृषी,वाणिज्य याबाबत चर्चा केली.

Post a Comment

Previous Post Next Post