जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत खो-खो खेळाचे प्रशिक्षण सुरू

। अहिल्यानगर । दि.30 डिसेंबर 2024 । क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अधिनस्त क्रीडा व युवक सेवा पुणे विभाग अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगरच्या जिल्हा कीडा प्रशिक्षण केंद्राअंतर्गत खो-खो राज्य क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे  हे १२ ते २५ वर्षे वयोगटातील शालेय, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नियमीत तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणार आहेत.

हे प्रशिक्षण केंद्र १ जानेवारी २०२५ पासून सकाळी ६.०० ते ८:३० आणि सायंकाळी ५:०० ते ७:३० या वेळेत जिल्हा क्रीडा संकुल वाडियापार्क अहिल्यानगर येथील खो-खो मैदानावर सुरू करण्यात येत आहे. जिल्ह्यातील खेळाडूंनी प्रशिक्षण केंद्रात प्रवेश नोंदवावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री. वाबळे यांना ७५८८१६९४९३ या क्रमांकावर संपर्क साधावा.


Post a Comment

Previous Post Next Post