। अहिल्यानगर । दि.30 डिसेंबर 2024 । आधीच महागाईने त्रस्त झालेल्या शेतकर्यांना नव्या वर्षात वाढणार्या खतांच्या किमतीला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. खतांचे भाव वाढल्यास शेतकर्यांपुढे चितेंचे ढग दिसत आहे.
हवामान बदलामुळे शेतकर्यांना अगोदरच आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यातच आता वाढणार्या रासायनिक खताच्या किंमतीमुळे शेतकर्यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. शेतकर्यांना आधीच त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने आर्थीक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
खरीप हंगामात झालेले नुकसान कसे भरुन काढावे, हा प्रश्न शेतकर्यांना सतावत असतानाच अचानक रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. रासायनिक खतांच्या किमती आधीच जास्त असताना खत उत्पादक कंपन्यांनी 1 जानेवारी 2025 पासून दरवाढ जाहीर होण्याची शक्यता आहे.