सामाजीक कार्यकर्ते भगवानराव घोडपडे पाटील यांचे निधन


। अहिल्यानगर । दि. 27 डिसेंबर 2024 । येथील ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ते भगवानराव घोरपडे पाटील यांचे अल्पशा आजाराने दि.27 डिसेंबर रोजी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्तात दोन मुले किशोर व राजू (इंजिनिअर जर्मनी), 5 मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.  

खाजगी हॉस्पिटलमध्ये भगवानराव घोरपडे पाटील यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांचे अल्पशा आजाराने नगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये  निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय 90 होते. घोरपडे पाटील हे जेष्ठ पत्रकार, आकाशवाणी माजी वार्ताहर, नगर प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष अनिल पाटील यांचे सासरे होत.

तसेच श्री क्षेत्र पंढरपूर येथील तनपुरे महाराज यांच्या चारोधाम ट्रस्ट चे विश्वस्त, पाथर्डी पंचायत समितीचे मा.उपसभापती आदी विवीध सामाजिक संस्थांशी वैकुंठवाशी घोरपडे पाटील यांचे निकटचे संबंध होते. वैजू बाभुळगाव ता. पाथर्डी या त्यांच्या मुळगावी दि. 27 डिसेंबर 2024 दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

👍 क्लिक करा आणि वाचा....सा.विजयमार्ग  

👍 क्लिक करा आणि वाचा....सा.विजयमार्ग  

👍 क्लिक करा आणि वाचा....सा.विजयमार्ग  

Post a Comment

Previous Post Next Post