सात महिन्यापासून पसार आरोपी जेरबंद

। अहिल्यानगर । दि.31 डिसेंबर 2024 । गंभीर गुन्ह्यात सात महिन्यांपासून पसार असलेला आरोपी नाकाबंदी दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केला. करण नंतर काळे ( वय 28, रा. उघडमळा, वडगाव गुप्ता) असे आरोपीचे नाव आहे. 

सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद परदेशी, आढाव, पोहेकॉ म्हस्के, नेहूल, फकीर शेख, पालवे, पोना महेश बोरूडे, पोकॉ नवनाथ दहिफळे, सचिन नागरे यांनी ही कारवाई केली. 

नगर- मनमाड रस्त्यावर सह्याद्री चौक येथे नाकाबंदी सुरू असताना एक जण मोटारसायकलवर तोंडाला रूमाल बांधून संशयितरित्या जाताना दिसला. पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले. त्याने त्याचे नाव करण नंतर काळे असे असल्याचे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post