नगर-पुणे महामार्गावरील वाहतूकीत 2 दिवस बदल


। अहिल्यानगर । दि.27 डिसेंबर 2024 । नगर ते पुणे महामार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी हा आदेश काढला आहे. पेरणे (जि. पुणे) येथे दि. 1 जानेवारी रोजी जयस्तंभ कार्यक्रम होणार आहे. जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होणार आहे. हा कार्यक्रम नगर- पुणे महामार्गालगत आहे.  

👍 क्लिक करा आणि वाचा....सा.विजयमार्ग 

महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होवून मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच महामार्गावरील वाहनाचा कार्यक्रमाकरीता आलेले भाविकांना धक्का लागून, अपघात होवून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये, याकरीता दि. 31 डिसेंबर ते दि. 2 जानेवारी रोजी 6 वाजेपर्यंत नगर- पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथुन पुण्याकडे जाणारी वाहतूक तसेच नगरकडून सरळ पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक मार्गामध्ये बदल केला आहे.

👍 क्लिक करा आणि वाचा....सा.विजयमार्ग 

बेलवंडी फाटा, धावलगाव पिंपरी कोळंडर उक्कडगाव बेलवंडी नगर- दौड महामार्गावरुन लोणी व्यंकनाथ, मढे वडगाव, काष्टी दौंड सोलापुर पुणे महामार्गामार्गे पुण्याकडे, नगरकडून सरळ पुण्याकडे जाणारे पर्यायी मार्ग- कायनेटीक चौक, केडगाव बायपास, अरणगाव बायपास कोळगाव,लोणी व्यंकनाथ, मढे वडगाव काष्टी दौंड,सोलापुर- पुणे महामार्गामार्गे पुण्याकडे नगरकडुन पुणेमार्गे मुंबई, नवी मुंबई, ठाण्याकडे जाण्याकरीता पर्यायी मार्ग- कल्याण बायपास, आळेफाटा, ओतूर, माळशेज घाट.

👍 क्लिक करा आणि वाचा....सा.विजयमार्ग  

 

Post a Comment

Previous Post Next Post