। जळगाव । दि. 17 नोव्हेंबर 2024 । अभिनेता गोविंदा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते आज महायुतीच्या प्रचारासाठी जळगाव जिल्ह्यात आले होते. शिंदे गटाचे नेते आणि अभिनेता गोविंदा आज महायुतीच्या प्रचारासाठी जळगाव जिल्ह्यात आले होते.
यावेळी पाचोर्यामध्ये रोड शो सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले, त्यांच्या छातीमध्ये दुखू लागले तसेच गोविंदा यांच्या ज्या पायाला गोळी लागली होती, तो पाय देखील दुखत असल्याने त्यांनी आपला दौरा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते तातडीने मुंबईकडे रवाना झाले.
यावेळी गोविंदा म्हणाले की, किशोर पाटील विजय झाल्यानंतर मी पुन्हा या ठिकाणी नक्कीच येईल, नक्कीच महायुती विजयी होईल. देशाला पुढे नेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व सितारे पुढे आले आहेत. माझ्यावर महाराष्ट्राच्या भूमीची कृपा राहिलेली आहे. संपूर्ण जगाने नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदेंमुळे महाराष्ट्राकडे बघायला सुरुवात केली, नक्कीच राज्याची प्रगती होत आहे. मी त्या शिवसेनेला देखील माझी सेवा दिलेली आहे. मी शिवसेनेसोबत जोडलेलो आहे. आता मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करत आहे, असं अभिनेता गोविंदा याने म्हटलं.
Tags:
Maharashtra