। अहिल्यानगर/ राहुरी । दि.15 नोव्हेंबर 2024 । लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा देणार्या भाजपचा महाराष्ट्रात पराभव करत महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आणत भाजच्या विचाराचा पराभव केला. तोच कित्ता विधानसभा निवडणुकीत देखील गिरवायचा आहे. त्यासाठी प्राजक्तला आमदार करा, मी मंत्री करतो अशी ग्वाही खासदार शरद पवार यांनी बुधवारी दिली.
👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर
राहुरी-नगर पाथर्डी विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते माजी खासदार प्रसाद तनपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा जिल्ह्याचे नेते राजेंद्र फाळके, दादाभाऊ कळमकर, बाळासाहेब हराळ, सुरेश वाबळे आदीसह नगर पाथर्डी राहुरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, कॉन्ग्रेस चे पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खा. शरद पवार म्हणाले की, सध्याचे सरकार लाडक्या बहिणींना खुश करत असताना गेल्या सहा महिन्यात सहा हजारहून अधिक महिला, भगिनींवर अपहरण, अत्याचार झालेल्या घटना घडलेल्या आहेत. तसेच गेल्या वर्षभरात शेतकर्यांचा कळकळ व कळवळा करणार्या या महायुती सरकारच्या काळात 1800 हून अधिक शेतकर्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत, याकडे पवारांनी लक्ष वेधले.
👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर