। अहिल्यानगर । दि.08 नोव्हेंबर 2024 । राहुरीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने पिंपळगाव उज्जैनी आणि धानोरी येथील गावठी दारू अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईप्रकरणी 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 2060 लिटर रसायन व 48 लिटर गावठी दारू नष्ट करण्यात आली आहे. यामध्ये एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
विभागीय उपायुक्त सागर धोमकर, अधीक्षक प्रमोद सोनोने, उपअधीक्षक प्रवीणकुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक चंद्रकांत रासकर, दुय्यम निरीक्षक शीतल पाटील, एम. बी. साळवे, एस. बी. विधाटे, नीलेश बुरा, सचिन गुंजाळ, दिलीप पवार, अंकुश कांबळे, जिया पठाण यांनी ही कारवाई केली. गावठी दारू निर्मिती, वाहतूक, विक्रीच्या ठिकाणी तसेच अवैध ढाब्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा निरीक्षक रासकर यांनी दिला आहे.
Tags:
Crime