। अहिल्यानगर । दि.18 नोव्हेंबर 2024 । पारनेर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे राणी लंके या निवडणूक लढवित आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच त्यांनी प्रचार सुरु केलेला आहे. या प्रचारात त्यांना पारनेर व नगर तालुक्यातील महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या आहेत. ही निवडणूक महिलांनी हाती घेतली असून राणी लंके यांना सर्वाधिक मतांनी विजयी करण्याचा निर्धार महिलांनी केलेला आहे.
👉विधानसभेच्या ६७ वर्षांच्या वाटचालीत
महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके निवडणूक लढवित आहेत. लंके यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध कामे तालुक्यात केलेली आहे. या जिल्हा परिषद सदस्य पदाच्या माध्यमातून त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थाचा चांगला अभ्यास झालेला आहे. त्यामुळे त्यांना आमदार झाल्यानंतर मतदारसंघाबरोबरच जिल्ह्यातील प्रश्न मांडणे सोपे होणार आहे.
👉प्राजक्तला आमदार करा, मी मंत्री करतो : खा. शरद पवार
लंके आमदार झाल्यानंतर महिलांच्या प्रश्नावर त्या वारंवार वाचा फोडून सरकाराला महिलांना न्याय द्यायला त्या भाग पाडतील, अशीच प्रतिक्रिया मतदारसंघातील महिला व्यक्त करीत आहेत तालुक्यताील पाण्याचा प्रश्न त्या आमदार झाल्यानंतर प्राधान्याने सोडवतील, ्अशी आशा महिलांना लागलेली आहे. महिलांची अडचण त्या ओळखून नेहमीच महिलांना न्याय देतील, असे मत पारनेर व नगर तालुक्यात व्यक्त केले जात आहे.
👉डॉ.शिवानंद भानुसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती
पारनेर व नगर तालुक्यातील महिलांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांना विजयी करण्याचा निर्धार केलेला आहे. लंके यांना नुसते विजयी करायचे नाही, तर त्यांना सर्वाधिक लीड मिळवून द्यायचे असल्याने दोन्ही तालुक्यातील महिलांनी प्रचाराची धुरा स्वतःच्या हाती घेतली असून प्रचाराची राळ उडवून दिलेली आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यात त्यांना चांगले वातावरण निर्माण झालेले आहे.प्रचारातील लंके यांची आघाडी कायम असून विरोधकांकडून आघाडी मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र त्यात त्यांना अपयश येत आहे.