घरात घुसून चोरी करणारा गजाआड

 

। अहिल्यानगर । दि.28 नोव्हेंबर 2024 । रात्रीचे वेळी घरात घुसून दागिने चोरणार्‍या भामट्याला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहदे. त्याच्याकडून सुमारे दीड लाखाचा मुद्दमाल जप्त करण्यात आला आहे. संजय ज्ञानदेव धिवर (वय 29 वर्षे, रा. इंगळेवस्ती, रेल्वे स्टेशन, अहिल्यानगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

🔆 थंडीचा जोर वाढला, नगरकर गारठले ; दोन दिवस थंडीची लाट!

नगर तालुक्यातील पोखर्डी येथील काजल आकाश पंधारे (वय 25 वर्षे, रा. पोखर्डी) ह्या माहेरी इंगळे वस्ती नगर येथे आल्या असता,रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने घरात घुसून पर्समधून सोन्याचे मंगळसूत्र चोरुन घेऊन गेल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. 

🔆 ईव्हीएम’विरोधासाठी विरोधक एकवटले...

सदर गुन्ह्याचा करत असताना पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना रेल्वे स्टेशन परिसरात चोरीतील दागिणे विक्री करण्यासाठी आला आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार रेल्वे स्टेशन परिसरात गुन्हे शोध पथकासह सापळा लावून धिवर या संशयित इसमास ताब्यात घेत त्याच्याकडे विचारपूस केली. 

🔆 कल्याणमध्ये गगणचुंबी इमारतीमधील फ्लॅटला आग!

त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्याची अंगझडती घेता त्याच्याकडे घरातून चोरी केलेले दागिने मिळून आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ शरद वाघ हे करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, 

उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सपोनि योगीता कोकाटे, सफौ सुनील भिंगारदिवे, पोहेकाँ योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, सलीम शेख, विक्रम वाघमारे, राजेंद्र पालवे, पोकाँ अभय कदम, अमोल गाडे, सतीश शिंदे, अतुल काजळे, दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post