। अहिल्यानगर । दि.07 नोव्हेंबर 2024 । विक्रीच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणार्या सराईतास एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. दि. 5 रोजी सपोनि माणिक चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली की वडगांव गुप्ता शिवारातील नगर-मनमाड रोडलगत थोटे पाटील यांच्या बंद पडलेल्या गोडावूनजवळ एक इसम अवैधरित्या गावठी कट्टा विक्री करण्यासाठी घेऊन येणार आहे.
त्यानुसार पथकाने नमूद ठिकाणाहून संतोष विलास कासार (वय 29 वर्षे, रा. वडगाव गुप्ता ता. अहिल्यानगर) यास शिताफीने पाठलाग करुन सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा, दोन काडतूस असा एकूण 25 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोहेकॉ राजू सुद्रीक यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि माणिक चौधरी, पोसई मनोज मोडे, पोहेकॉ राजू सुद्रिक, पोहेकॉ नितीन उगलमुगले, पोकॉ जयसिंग शिंदे, पोकॉ किशोर जाधव यांच्या पथकाने केली.
💥 राजकीय ट्विस्ट कळमकर यांना प्रा. गाडे सर यांचा पाठिंबा
💥 जिल्ह्यात किती उमेदवार रिंगणात...वाचा सविस्तर
💥 आघाडीचा धर्म पाळत किरण काळेंचा अभिषेक कळमकरांना...