गावठी कट्टा, काडतुसे बाळगणारा जेरबंद!


। अहिल्यानगर । दि.19 नोव्हेंबर 2024 ।तालुक्यातील धनगरवाडी परिसरातून विनापरवाना गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगणार्‍यास जेरबंद करण्यात आले आहे. नीलेश बाबासाहेब ससाणे (वय 23 वर्षे रा. सिदधार्थनगर, अहिल्यानगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

💥 मतदानासाठी निश्‍चित केलेले 12 प्रकारचे पुरावे ग्राह्य : जिल्हाधिकारी  

धनगरवाडी परिसरात हनुमान मंदिर शिवारात एक इसम बेकायदेशिरपणे एक गावठी कट्टा, काडतुस बाळगत आहे. त्यावरुन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक तयार करुन सदर आरोपीला धनगरवाडी येथे सापळा लावून पकडले. त्याच्याकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस असा एकुण 25 हजार 500 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

💥 कोयत्याचा धाक दाखवून दागिने व रोकड पळवली

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोकाँ किशोर जाधव यांच्या फिर्यादीवरुन  भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. आरोपी ससाणे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर तोफखाना, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. 

💥  विधानसभेच्या ६७ वर्षांच्या वाटचालीत आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदार….

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपाधीक्षक संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि माणिक चौधरी, पोसई विकास जाधव, पोसई देविदास भालेराव, पोहेकाँ राजू सुद्रिक, पोकाँ किशोर जाधव, पोकाँ भगवान वंजारी, पोकाँ सुरेश सानप याच्या पथकाने केली आहे.

💥 मुंबईतील बीकेसी मेट्रो स्थानकात आग 

Post a Comment

Previous Post Next Post