‘ईव्हीएम’विरोधासाठी विरोधक एकवटले
उमेदवारांना पुरावे गोळा करण्याचे निर्देश; न्यायालयीन लढाईचे संकेत
। मुंबई । दि.27 नोव्हेंबर 2024 । राज्यात महाविकास आघाडीच्या सभांना मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद, लोकसभेतील यश यानंतरही महाविकास आघाडीचा दारूण पराभव पत्करावा लागला आहे. निकालानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आपल्या उमेदवारांची बैठक घेत चिंतन केले.
👉 कल्याणमध्ये गगणचुंबी इमारतीला आग!
यावेळी उमेदवारांनी ईव्हीएमवर दोष दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शरद पवारांनी आपल्या उमेदवारांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत न्यायालयीन लढाई लढण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत शरद पवारांनी कायदेशीर लढाईसाठी विशेष वकिलांची टीम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
👉 आशुतोषला निवडून द्या, मी मंत्रिपद देतो : ना.अजित पवार
उमेदवारांना व्हीव्हीपॅट तपासणीसाठी पुरावे गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, इंडिया आघाडी देखील या मुद्द्यावर एकत्र येऊन संघर्ष करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता मागे हटायचे नाही, लढायचे, असा ठाम संदेश उमेदवारांना देत त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींचा विरोध करण्याची तयारी दाखवली.