। अहिल्यानगर । दि. 4 नोव्हेंबर 2024 । नगर शहर विधानसभा निवडणुकीत काल घडलेल्या अर्ज माघारीच्या नाट्यमय घड़ामोडीनंतर (मंगळवारी) पुन्हा राजकीय ट्विस्ट पाहयला मिळाला. महाआघाडीतुन बंडखोरी केलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी मंगळवारी सायंकाळी महाआघाडीचे अधिकृत उमेदवार अभिषेक कळमकर यांना पाठिंबा जाहिर केला.
💥 आघाडीचा धर्म पाळत किरण काळेंचा अभिषेक कळमकरांना पाठिंबा जाहीर
यावेळी प्रा.गाडे म्हणाले की, माघारीचा अर्ज चुकुन कार्यकर्त्यांच्या हातात राहिला. दुसरा अर्ज लिहीपर्यत वेळ संपली मात्र आता अभिषेक कळमकर यांना पाठिंबा देत असुन स्वतः उमेदवार समजुन सर्व शिवसैनिकांनी प्रयत्न करावेत. खा.निलेश लंके यांनी महाआघाडीची एकजुट ठेऊन नगर शहर दहशत मुक्त करण्यासाठी सर्वांनी कामाला लागण्याची विनंती केली.
💥 जिल्ह्यात किती उमेदवार रिंगणात...वाचा सविस्तर
यावेळी खा.निलेश लंके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड, कॉग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे बाळासाहेब बोराटे, योगिराज गाडे उपस्थीत होते.