👉जिल्ह्यात 14 हजार 699 जणांनी दिली टीईटी परीक्षा
पंपिंग स्टेशन रोड, ताठे नगर येथे गोल्ड स्टार कॅफे, द्वारकाधीश कॉप्लेक्स, श्रीराम चौक येथे लव्ह बर्ड कॅफे, पारिजात चौक, गुलमोहर रोड येथे हंगरेला कॅफे या ठिकाणी कॉफी शॉपचा बोर्ड लाऊन कुठलेही कॉफी अथवा खाद्य पदार्थ विक्रीसाठी न ठेवता लाकडी कंपार्टमेंट तयार करून मुला-मुलींना बसण्यासाठी व अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली होती.
👉येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग
त्यानुसार तीनही ठिकाणी रविवारी तोफखाना पोलिस ठाण्याच्या पथकाने छापे टाकून कारवाई केली. कॉफीशॉपमध्ये दर्शनी भागात कॉफीशॉपचा परवाना नव्हता. कॉफी बनविण्यासाठी लागणारे साहित्य, गॅस किंवा इतर साहित्य नव्हते. या ठिकाणी अश्लील चाळे करण्यासाठी आडोशासाठी लावण्यात आलेले पडदे तात्काळ काढून टाकण्यात आले. मुला-मुलींना तोंडी समज देऊन सोडण्यात आले.
👉येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग
या प्रकरणी गोल्ड स्टार कॅफेचा मालक ओंकार कैलास ताठे (वय २३, रा. ताठे नगर, सावेडी), लव्ह बर्ड कॅफेचा चालक रुषीकेश सखाराम निर्मळ (वय २४, रा.श्रध्दा हॉटेल शेजारी) हंगरेला कॅफेचा चालक ओमकार दत्तात्रय कोठुळे (वय २५, रा. भूतकरवाडी चौक यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १२९, १३१ (क) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
👉राज्य उत्पादन शुल्क विभागाचे गावठी दारू अड्ड्यावर छापे
पोलीस निरीक्षक यांचे आवाहन
तोफखाना पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकर यांच्याकडुन नागरीकांना नम्र आवाहन करण्यात आले आहे की, कॉलेज, क्लासेसला जाणार्या मुलीच्या नातेवाईकांनी आपल्या पाल्याच्या वर्तनुकीवर बारकाईने व जबादारीने लक्ष ठेवावे. आपल्या पाल्याचे मित्र कोण आहेत, ते बाहेर काही टवाळखोरी करतात काय ? या बाबत बारकाईने लक्ष ठेवावे. यापुढे असे टवाळखोर व सार्वजनिक ठिकणी बेशिस्त वर्तनुक करणारी इसमे अढळुन आल्यास तोफखाना पोलीस स्टेशनकडुन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची खबरदारी घ्यावी.
आनंद कोकरे
पोलीस निरीक्षक तोफखाना पोलीस स्टेशन, अहिल्यानगर.