मोनिका राजळे यांना हॅट्रीकची संधी द्या : पंकजा मुंडे

। अहिल्यानगर / पाथर्डी । दि.18 नोव्हेंबर 2024 । पाथर्डी शेवगाव मतदार संघाची आणि मोनिका राजळे यांची जबाबदारी पक्षाने माझ्यावर दिलेली असुन मी राज्याची स्टार प्रचारक म्हणुन समक्ष अपस्थित राहुन सांगत आहे. तुमच्या लेकीची जबाबदारी तुम्हाला पार पाडायची आहे. माझे योगदान वाया जावु देवु नका मोनिकाला माझ्या बरोबर पाठविण्याची जबाबदारी मी तुमच्यावर देत आहे. जसे आम्ही विज बिल झिरो केले तसे तुम्ही विरोधकांना झिरो करा, ऊस तोडणी मजुरांनी मतदान करुनच जा असे आवाहन आमदार पंकजाताई मुंढे यांनी पाथर्डी येथे महायुतीच्या आमदार मोनिका राजळे यांच्या प्रचार सभेमध्ये केले आहे.


यावेळी त्यापुढे म्हणाल्या की, गेल्या दहा वर्षाच्या काळात मोनिका राजळे यांनी मतदार संघामध्ये खुप कामे केली, मी मंत्री असतांना परळीपेक्षा एक रुपयाही कमी मी पाथर्डीला दिलेला नाही. युती सरकारने लाडक्या बहीणींना पैसे दिले, शतक-यांना भरगोस मदत केली विज बिल माफ केली, सर्व जर महायुती सरकारने दिले तर जनतेने मते पण आम्हालाच दया, मते वाया घालु नका मी आपल्यासमोर उभी राहुन सांगत आहे.

👉विधानसभेच्या ६७ वर्षांच्या वाटचालीत आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदार…. 

कुठल्याही भुलथापांना बळी पडु नका, कुठलाहि प्रश्न असुदया मी तुमच्या पाठीशी सदैव उभी आहे. काळजी करु नका थोडे दिवस दया मला उस तोडणी महामंडळ मिळालेच तर मी तुमच्या हातातील कोयता खाली ठेवण्याचे काम करील व तुम्हाला स्वाभिमान मिळवुन देईल, माझ्या जिवनातील विजय आणि पराजय पचविण्यासाठी मी समर्थ असुन मला साथ देण्यासाठी मोनिका राजळे यांना तुम्हाला निवडुन दयावेच लागेल असे आव्हान यावेळी त्यांनी केले.

👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर

यावेळी ना. प्रा. एस.पी बघेल  केंद्रीय मंत्री, पंचायत राज, पशुसंवर्धन भारत सरकार, केंद्रीय निरिक्षक, आमदार महेश कासवाल, डॉ. मृत्युजय गर्जे, अभय आव्हाड, धनंजय बडे,, नवनाथ पडळकर, सुनिल साळवे, सुवेंद्र गांधी, राहुल राजळे, भिमराव फुंदे, केशव आंधळे, शिवाजी खेडकर, कचरु चोथे, नारायण पालवे, अमोल गर्जे, मुकुंद गर्जे, नितिन गर्जे, संजय किर्तने, बाबा राजगुरु, पिराजी किर्तने,  बापुसाहेब पाटेकर, बापूसाहेब भोसले, उमेश खेडकर, भगवान साठे, काशिबाई गोल्हार, आशाताई गरड आदिसह मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर  

Post a Comment

Previous Post Next Post