।
अहिल्यानगर । दि.28 नोव्हेंबर 2024 । विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर
पराभूतांनी ईव्हीएमवर खापर फोडले आहे. परंतु आता महायुतीचे पराभूत उमेदवार
प्रा.राम शिंदे यांनी देखील ईव्हीएम पडताळणीची मागणी केली आहे. यावरुन आता
महायुतीचे पराभूत उमेदवार देखील ईव्हीएमवर शंका उपस्थित करताना दिसत आहे.
कर्जत-
जामखेडचे भाजपचे उमेदवार प्रा.राम शिंदे यांनी त्यांच्या मतदारसंघातील 17
बूथवरील ईव्हीएमची फेरतपासणीची मागणी केली आहे. यासाठी राम शिंदे यांनी 8
लाख 2 हजार 400 रुपयांचे शुल्क शासनानकडे भरले असल्याची खात्रीलायम माहिती
मिळाली आहे.
कर्जत
- जामखेडची विधानसभेची निवडणुकी अटीतटीची ठरली होती. महाविकास आघाडीचे
उमेदवार रोहित पवार आणि महायुतीचे राम शिंदे यांच्यात सरळ लढत झाली. यानंतर
अजित पवार आणि रोहित पवार यांच्या भेटीवर शिंदे यांनी पवारांवर टिका केली
होती. तर आता शिंदे यांनी ईव्हीएम पडताळणीची मागणी केली आहे.