। अहिल्यानगर । दि.25 नोव्हेंबर 2024 । राज्यात महायुतीला भरघोस यश आल्यानंतर आज प्रथमच महायुतीमधील मित्र पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर आमदार राम शिंदे यांनी आरोप केले आहे. यावरुन शिंदे यांनी आपल्या पराभवासाठी अजित पवार जबाबदार असल्याचे म्हंटले आहे
💥 रोहित पवार यांनी घेतला अजित पवारांचा आशिर्वाद!
राज्यामध्ये काही ठिकाणी महायुतीच्या उमदेवारांचा पराभव झाला. आता त्या पराभवावरुन महायुतीमधील नाराजी समोर येऊ लागली आहे. कर्जत जामखेडमध्ये महायुतीमधील भाजपचे उमेदवार राम शिंदे यांचा केवळ 1243 मतांनी पराभव झाला.
💥 राज्यात अपक्ष आणि बंडखोर उमेदवार किंगमेकर ठरणार का?
परावभ हा शिंदे यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यांनी अजित पवारांवर आरोप करताना मतदार संघात युतीचा धर्म पाळला गेला नसल्याचे म्हंटले आहे. तसेच माझा बळी दिला गेला. पवार कुटुंबात अघोषित करार झाला होता, हे आता सिद्ध झाल्याचे राम शिंदे यांनी म्हटले आहे. त्यामुळे महायुतीमधील नाराजीनाट्याला सुरुवात झाली असल्याचे चर्चा राजकारणात रंगू लागली आहे.
💥 विधानसभेच्या ६७ वर्षांच्या वाटचालीत आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदार…