सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या २०६२ तक्रारी प्राप्त; २०५९ निकाली
२३४ कोटी ४९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त
। मुंबई । दि.03 नोव्हेंबर 2024 । राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण २०६२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी २०५९ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
👉सोन्याचे मंगळसूत्र ओरबडले ; महिला जखमी
सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲप स्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.
👉अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण ठार
२३४ कोटी ४९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त
राज्य शासन व केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण 234 कोटी 49 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले.
👉उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत...