राज्यात दोन दिवस थंडीची लाट!
। पुणे । दि.28 नोव्हेंबर 2024 । राज्यात थंडीचा गारठा चांगलाच वाढला असतांना अंगाला झोंबणारे वारे देखील वाहत आहे. त्यातच तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि घाट भागात आज गुरूवार आणि उद्या शुक्रवार थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
🔆 कल्याणमध्ये गगणचुंबी इमारतीमधील फ्लॅटला आग!
नाशिक जिल्हा, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर जिल्हा, पुणे जिल्हा आणि पुणे घाट परिसरात 28 नोव्हेंबर आणि 29 नोव्हेंबर रोजी थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला असून सतर्कतेचा इशाराही दिला आहे.
🔆 बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
नोंव्हेबरच्या अंतिम आठवड्यात तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून डिसेंबरच्या पहिल्या आठ दिवसात थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गारवा वाढताना दिसताच आता मंकी कॅपची मोठ्या प्रमाणात मागणी वाढताना दिसत आहे.
🔆 रोहित पवार यांनी घेतला अजित पवारांचा आशिर्वाद!
🔆 क्लिक करा...वाचा साप्ताहिक विजयमार्ग