। मुंबई । दि.26 नोव्हेंबर 2024 । कल्याण येथील एका गगणचुंबी उंच इमारती 14 व्या मजल्यावर भीषण आग लागली. अचनाक लागल्याने या आगीने ज्वालांसह धुराचे लोट उठले. या धुराचे लोट लांबपर्यंत दिसत होते. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
✈ क्लिक करा...बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
या आगीमध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसली तरी या भीषण आगीमध्ये इमारतीमधील 5 फ्लॅट पूर्णपणे जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भीषण आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
✈ क्लिक करा...अजित पवार यांच्यावर राम शिंदे यांचा आरोप...
अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल 3 तास शर्थीचे प्रयत्न करत अखेर पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास ही आग आटोक्यात आणल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र आग लागलेल्या इमारतीमधील अनेक कुटुंब भेदरलेल्या अवस्थेत दिसत होते. यामध्ये काही कुटुंबाच्या संसाराची राख रांगोळी झाल्याची माहिती पुढे येत आहे.
✈ क्लिक करा...आशुतोषला निवडून द्या, मी मंत्रिपद देतो : ना.अजित पवार