। मुंबई । दि.23 नोव्हेंबर 2024 । राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी अवघे काही तास उरले असतांनाच निवडून आलेल्या आमदारांना सांभाळण्यासाठी तसेच संख्याबळ कमी पडल्यास जुळवाजुळव करण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शुक्रवारी बैठका घेत आढावा घेतला.
👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सागर बंगल्यावर बैठका घेत आढावा घेतला. एक्झिट पोलचे निकाल समोर आल्यानंतर महायुतीने प्लॅन बी आखल्याची माहिती समोर आली आहे.
👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर
दुसरीकडे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत सत्ता स्थापन केली तरी आपण त्यांच्यासोबत असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे शिंदे गटातही काहीतरी शिजतंय, असा अंदाज आहे.
👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर
महाविकास आघाडीच्या गोटातून अतिशय महत्त्वाची माहिती येत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जे बंडखोर उमेदवार विजयी होऊ शकतात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर
प्रत्येक पक्ष कामाला लागलेला बघायला मिळतोय. काही राजकीय मंडळीकडून अपक्ष आणि बंडखोर यांची भुमीका निर्णाय ठरण्याची शक्यता देखील राजकीय वर्तुळात चर्चेली जात आहे.