👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर
दरम्यान, कुनगर यांनी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात तक्रार दखल केली होती. त्या तक्रारीवरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एस. लोणे यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर कुनगर यांच्या फिर्यादीवरून सोमवारी (18 नोव्हेंबर) नगर तालुका पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर
भूषण दिपेश देशमुख (रा. लक्ष्मी संकुल, भुषण कॉलनी, एमजी कॉलेजच्या पाठीमागे, ता. जि. जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदरची घटना 11 सप्टेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 दरम्यान घडली आहे. फिर्यादी हे शिक्षण घेतात. ते सप्टेंबर 2022 ते डिसेंबर 2022 दरम्यान नगर तालुक्यातील साकत खुर्द व अहिल्यानगर शहरातील अहमदनगर कॉलेजमध्ये असताना त्यांनी संशयित आरोपीकडे शेअर मार्केटसाठी गुंतवणूक केली होती.
👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर
त्याने गुंतवणूकीवर 10 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. फिर्यादी यांनी संशयित आरोपीला युपीआय मार्फत चार लाख रूपये पाठविले होते. दरम्यान, संशयित आरोपीने फिर्यादीला मोबदला न देता त्यांची फसवणूक केली.