आशुतोषला निवडून द्या, मी मंत्रिपद देतो : ना.अजित पवार

।  कोपरगाव । दि. 17 नोव्हेंबर 2024 । आपण जे काही करतो ते या मायबाप जनतेसाठी करतो. त्यांच्यासाठी वेळ देणे आणि त्यांचे प्रश्न सोडविणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य आहे. कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी तुझे सर्वच हट्ट मी पूर्ण करीन, तुला कधीही निधी कमी पडू दिला नाही आणि पुढेही कमी पडू देणार नाही. 

👉 अजित पवार यांच्याही बॅगांची तपासणी...हशा पिकला... 

आजवर तुझ्या पाठीशी होतो व यापुढेही तुझ्या पाठीशी राहील अशी ग्वाही कोपरगाव येथील डॉ.बाबासाहेब मैदानावर पार पडलेल्या जाहीर सभेत उपस्थित जनसागराच्या साक्षीने राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी दिली. त्याचबरोबर आशुतोष काळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, मी मंत्रीपद देतो असे आश्वासन दिले.

👉  डॉ.शिवानंद भानुसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती 

Post a Comment

Previous Post Next Post