। अहिल्यानगर । दि.18 नोव्हेंबर 2024 । विक्रीला भाजीपाला आणण्यासाठी मार्केटयार्ड येथे जात असलेल्या महिलेला तिघांनी रस्त्यात आडवून कोयत्याचा धाक दाखवून लुटले. पाच ग्रॅमचे सोन्याचे पेंडल, मोबाईल व पाच हजाराची रोकड असा 16 हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. सावेडी गाव येथे गुरूवारी (14 नोव्हेंबर) पहाटे पावणे पाचच्या सुमारास ही घटना घडली.
👉विधानसभेच्या ६७ वर्षांच्या वाटचालीत आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदार….
या प्रकरणी अज्ञात तिघांविरूध्द जबरी चोरी, आर्म अॅक्ट कलमानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबिका व्यंकटेश चौधरी (वय 55 रा. मराठी शाळेजवळ, बोल्हेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची बोल्हेगाव येथे भाजीपाला विक्रीची हातगाडी आहे.
👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर
त्या मार्केटयार्ड येथे भाजीपाला आणण्यासाठी गुरूवारी पहाटे दुचाकीवरून जात असताना जुने बोल्हेगाव गावठाण रस्त्याने सावेडी गावात आल्यावर दुचाकीवरून आलेल्या तिघा अनोळखींनी त्यांना अडविले. फिर्यादीच्या दुचाकीला एकाने लाथ मारल्याने फिर्यादी खाली पडून जखमी झाल्या. दुचाकीचे मोठे नुकसान झाले. ते सर्व उतरून फिर्यादीजवळ आले व त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून पाच ग्रॅमचे सोन्याचे पेंडल,
👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर
मोबाईल व पाच हजाराची रोकड असा 16 हजारांचा ऐवज बळजबरीने काढून घेतला. ते तिघे त्यांच्याकडील दुचाकीवरून निघून गेले. त्यानंतर फिर्यादी घरी गेल्या व त्यांनी भावाला माहिती दिली. त्यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून गुन्हा दाखल करून घेतला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.