। पुणे । दि. 14 नोव्हेंबर 2024 । राज्यात विधानसभा निवडणुका सुरू असून या निवडणुकीसाठी प्रचारधुमाळी जोमात सुरू आहे. त्यातच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सलग दुसर्या दिवशी बॅगांची तपासणी केल्यामुळे ठाकरे चांगलेच संतापल्याचे दिसून आले.
यावरून राजकारण तापले असतांनाच बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही बॅगा व हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आल्याची घटना घडली आहे. या तपासणीत अधिकार्यांच्या हाती एका बॅगेत चकल्या लागल्या.
अजित पवारांनी त्या त्यांना खाण्याची सूचना केली. यावेळी उपस्थितांत एकच हशा पिकला. उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची यवतमाळ व लातूरमध्ये तपासणी करण्यात आली होती. या मुद्यावरून त्यांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली होती.
👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर
👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर
👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर
Tags:
Breaking