प्रसाद शिंदे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर

। अहिल्यानगर । दि.03 नोव्हेंबर 2024 । शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी अविरत कार्य करणारे, सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षकनेते  प्रसाद शिंदे यांना राया क्रांतिकारक फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

 👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर

राया क्रांतिकारक फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य फाऊंडेशनचे संस्थापक कृष्णा गोहिरे, आयोजक नामदेव जाधव यांनी सांगितले की, सामाजिक कार्य करणार्‍या महाराष्ट्रातील विविध विभागांतील व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. अहिल्यानगर येथील प्रसाद शिंदे यांना फाऊंडेशन माध्यमातून देण्यात येणार राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार  देताना विशेष आनंद होत आहे.

 👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर

शिंदे यांच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अविरत कार्य चालू आहे. शिक्षकांना न्याय मिळावा म्हणून त्यांच्या माध्यमातून आंदोलने केली आहेत, शिक्षकांचे नेते म्हणून त्यांची ओळख असून रायझिंग ट्रायबल फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात.

👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर  

यामध्ये रक्तदान शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण, तसेच आदिवासी बांधवांसाठी विशेष कार्य करतात त्यामध्ये आदिवासी बांधवांना घरकुले मिळावेत, जातीचे दाखले मिळावेत, मुलांना शिक्षण मिळावे, महिलांना रोजगार मिळावा, विविध योजनांचा फायदा आदिवासी बांधवांना मिळवून देण्यासाठी कार्य सुरू आहेत. 

👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर  

शिंदे यांचे कार्य युवकांसाठी कौतुकास्पद असल्याचे आयोजकांनी म्हंटले आहे. महाराष्ट्रातून 21 व्यक्तींना पुरस्कार जाहीर झाला असून पुरस्कार सोहळा नाशिक येथे लवकरच पार पडणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post