जिल्ह्यात 14 हजार 699 जणांनी दिली टीईटी परीक्षा


। अहिल्यानगर । दि.11 नोव्हेंबर 2024 । शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली टीईटी परीक्षा जिल्ह्यात 14 हजार 690 जणांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा रविवारी सुरळीत पार पडली. यामध्ये पेपर क्रमांक.1 सकाळी 10:30 ते दुपारी 01:00 व पेपर क्रमांक.2 दुपारी 2:30 ते सायंकाळी 05:00 वाजता पार पडली.

सदर परीक्षेसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे नियंत्रण अधिकारी व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) हे सहनियंत्रण अधिकारी व उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे जिल्हा परिरक्षक व उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची सहा.जिल्हा परिरक्षक म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती. सदर परीक्षेसाठी अहिल्यानगर जिल्हयामध्ये पेपर क्र.1 साठी 6373 परिक्षार्थीपैकी 5928 ब पेपर क्र.2 साठी 9418 परिक्षार्थीपैकी 8762 असे एकुण 14690 परिक्षार्थी हजर होते.

सदर परीक्षेस अहिल्यानगर शहर व शहरालगत पेपर क्र.1 साठी 17 व पेपर क्र.2 साठी 28 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले होते. सदर परीक्षेसाठी पेपर क्र.1 साठी 4 झोनल अधिकारी, 17 सहा.परीरक्षक, 17 केंद्रसंचालक, 60 पर्यवेक्षक ब 272 समावेक्षक आणि पेपर क्र.2 साठी 6 झोनल अधिकारी, 28 सहा.परीरक्षक, 28 केंद्रसंचालक, 80 पर्यवेक्षक, 400 समावेक्षक यांची नियुक्ती केलेली होती.

या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत परीक्षार्थींची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीव्दारे  करण्यात आली होती. परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक परीक्षा दालनात, केंद्राच्या प्रवेशद्वारावर व केंद्र संचालक यांचे नियंत्रण कक्षात सी.सी.टी.व्ही यंत्रणा बसविण्यात आलेली होती. सर्व परीक्षार्थीना पेपर क्र. साठी सकाळी 9:00 वाजता व पेपर क्र.2 साठी दुपारी 1:00 वाजता परीक्षा कक्षात प्रवेश दिला गेला आहे.  

परीक्षेसाठी अध्यक्ष, जिल्हा परीक्षा आयोजन व संनियंत्रण समिती तथा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, उपाध्यक्ष, जिल्हा परीक्षा आयोजन व संनियंत्रण समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर आशिष येरेकर यांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. तसेच डॉ.राजेश बनकर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट), भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), व शिक्षणाधिकारी (योजना)  बाळासाहेब बुगे यांच्या भरारी पथकाने परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.

परीक्षेसाठी मिना शिवगुंडे यांनी जिल्हा परिरक्षक, आकाश दरेकर. उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी सहा.जिल्हा परिरक्षक, राजश्री घोडके, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) हेमलता गलांडे, अधीक्षक वर्ग-2, श्रीम.जयश्री कार्ले यांचे पथकाने साहित्य संकलनाचे कामकाज पाहिले. रमेश कासार, लेखाधिकारी, विलास साठे व सुरेश ढवळे, विस्तार अधिकारी (शिक्षण) यांनी बाहन व्यवस्था कामकाज पाहिले. श्रीम.मनीषा कुलट, विस्तार अधिकारी (शिक्षण), संदीप तमनर, योगेश गवांदे, मनोज चोभे, प्रशांत सदावर्ते यांनी परीक्षेचे संपूर्ण कामकाज पाहिले. परीक्षा शांततेत व सुव्यवस्थेत पार पडली.

Post a Comment

Previous Post Next Post