। अहिल्यानगर । दि.18 नोव्हेंबर 2024 । मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळख जवळ नसल्यास अन्य 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल. मतदान केंद्रामध्ये मोबाईल बाळगण्यास मनाई असल्याने कोणीही मतदान केंद्रामध्ये मोबाईल बाळगू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.
💥 प्रियांका गांधींच्या नागपूर रोड शोमध्ये गोंधळ !
20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानावेळी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू न शकणार्या मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.
💥 राणी लंके यांच्या पाठीशी महिलांची ताकद मोठी...
यामध्ये आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना , पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, निवृत्ती वेतनाची दस्तावेज,
💥 मोनिका राजळे यांना हॅट्रीकची संधी द्या : पंकजा मुंडे
तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.
💥 कोयत्याचा धाक दाखवून दागिने व रोकड पळवली
प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे. या 12 ओळखपत्रांपैकी कोणत्याही एका ओळखपत्राची मूळ प्रत मतदानावेळी जवळ बाळगावीत, असे आवाहनही सालीमठ यांनी केले आहे.