केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना दिवाळी भेट

केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना दिवाळी भेट

कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ


। नवी दिल्ली । दि.17 ऑक्टोबर 2024  देशातील एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी  एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने महागाई भात्यामध्ये 3% ची वाढ केल्यामुळे केंद्रीय कर्मचार्‍यांची दिवाळी गोड होणार आहे.

त्यामुळे  केंद्र  सरकारच्या  कोट्यवधी  कर्मचारी  आणि  पेन्शनधारकांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे.  सरकारने  महागाई  भत्त्यात  वाढ  केल्यामुळे  कर्मचार्‍यांना  मिळणारा (डीए) आता 53% टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.

महागाई भत्ता वाढवण्यात आला असून तो 1 जुलै 2024 पासून लागू असेल. यामुळे लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्सला लाभ होणार आहे. केंद्राच्या सेवेत 49 लाख कर्मचारी आहेत तर 60 लाख निवृत्तीवेतनधारक आहेत.  

केंद्र सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता (डीए) वाढवते. या वर्षी म्हणजेच 2024 मध्येही जानेवारीत 4 टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवण्यात आला होता, तर नुकत्याच झालेल्या बैठकीत जुलैसाठी डीए वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Post a Comment

Previous Post Next Post