अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर


। मुंबई । दि.26ऑक्टोबर 2024 ।  गेल्या अनेक दिवसांपासून नगर शहरामधून विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र आज ती प्रतिक्षा संपली असून आज जयंत पाटील यांनी नगरच्या जागेवर उमेदवारी जाहीर केली आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

Post a Comment

Previous Post Next Post