अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा विजयादशमी समारंभ

 अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा विजयादशमी समारंभ उत्साहात संपन्न


| अहिल्यानगर | दि.12 ऑक्टोबर 2024 |  दरवर्षीप्रमाणे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने साजरा करण्यात येणारा विजयादशमी समारंभ मोठा उत्साहात पार पडला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रा. ह. दरे, संस्था उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, संस्था सचिव विधीतज्ञ विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव जयंत वाघ, संस्थेच्या खजिनदार विधीतज्ञ दीपलक्ष्मी म्हसे, संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त जी.डी. खानदेशे, ज्येष्ठ विश्वस्त सिताराम अण्णा खिलारी, मुकेश मुळे, संस्था विश्वस्त पदाधिकारी व सन्माननीय कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेसिडेन्शिअल महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही .के पोकळे यांनी केले.

तसेच संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्ते बाबत आणि प्रगती बाबत चा लेखाजोखा संस्थेचे सचिव विधी तज्ञ विश्वासराव आठरे पाटील यांनी मांडले. यावेळी अध्यक्षीय भाषणात संस्था अध्यक्ष मा.रा.ह.दरे यांनी सर्व उपस्थितांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात संस्थेच्या माजी दिवंगत पदाधिकार्‍यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

विविध खेळाडू, पीएच.डी,सेट नेट प्राप्त प्राध्यापक यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संस्थेतील विविध शाखा शाळेतील आजी-माजी मुख्याध्यापक, प्राचार्य पर्यवेक्षक तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब सागडे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. रवींद्र देवढे, धनंजय म्हस्के, ढगे सर यांनी केले.

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग  

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग  

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग  

Post a Comment

Previous Post Next Post