नवनागापूर येथील श्री रेणुका माता मंदिरात नवरात्रनिमित्त भाविकांची मांदियाळी

| अहमदनगर | दि.08 ऑक्टोबर 2024 |  एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. नवरात्रनिमित्त मंदिरात भाविकांची मांदियाळी वाढली आहे. तर ट्रस्टच्या वतीने धार्मिक कार्यक्रमासह विविध सामाजिक उपक्रम सुरु आहे.


मंदिरा समोरील मैदान विविध पाळणे थाटले असून, भाविकांसह बालगोपाळ या पाळण्याचा आनंद घेत आहे. तर विविधे खाद्य पदार्थांचे स्टॉल, लहान मुलांसाठी खेळण्यांचे व महिलांच्या विविध साहित्यांचे स्टॉलने परिसर गजबजला आहे. मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप आले असून, भाविक नवरात्रच्या पहिल्या माळेपासूनच मोठी गर्दी करत आहे.


पंचक्रोशीतील हजारो भाविक दररोज दर्शनाला हजेरी लावत असून, दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागत आहे. संध्याकाळी आरती व दर्शनाला मोठी गर्दी होत आहे. तसेच ट्रस्टच्या माध्यमातून मंदिरात भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, मोफत स्त्री रोग तपासणी शिबिराचे उपक्रम सुरु आहेत. 

नवरात्रोत्सवानिमित्त सुरु असलेल्या विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमासाठी ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्‍वस्त गोरख कातोरे, राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर आदी परिश्रम घेत आहे.

👉कर्जत तहसिल कार्यालयात जप्त वाळू साठ्याचा लिलाव

👉घटस्थापनेच्या मुहुर्तावर ‘नगर जनसंवाद यात्रा’ 

👉अहिल्यानगर नामकरणातून नगरच्या भूमीचा सन्मान

Post a Comment

Previous Post Next Post