अजित पवार गटाचे बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार!


| मुंबई | दि.12 ऑक्टोबर 2024 | माजी आमदार आणि नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सामील झालेल्या बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला आहे. सिद्दीकी यांच्यावर दोन ते तीन राऊंड फायर झाले असून एक गोळी लागली आहे. त्यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 

अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तसेच माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर शनिवारी (दि.१२) रोजी रात्री वांद्रे परिसरात अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची माहिती पुढे येत आहे. बाबा सिद्धिकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
 

प्राथमिक माहितीनुसार तोंडाला रुमाल बांधून आलेले तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. या गोळीबाराच्या घटनेने राजकीय वातावरण चांगेलच तापणार असल्याचे दिसते.

Post a Comment

Previous Post Next Post