हर्षवर्धन पाटील यांचा राजकीय वणवास संपला ; पाटलांनी तुतारी फुंकली

|  पुणे | दि.08 ऑक्टोबर 2024 | विधानसभेच्या निवडणुकीपुर्वी महाविकास आघाडीत इनकमिंग होत असल्याचे चित्र आहे. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी  सोमवार (दि.०७ ऑक्टोबर) रोजी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. राजकारणात भाजपाला हा मोठा धक्का मानला जात आहे. यानंतर आजुनही कोण कोण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात येणार आणि कोण हाती तुतारी घेण्यार यावर चर्चा सुरु झाली आहे.

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इंदापूरचं शिवधनुष्य हर्षवर्धन पाटील यांनी हाती घ्यावं, असं वक्तव्य केलंय. यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीबाबत सुतोवाच केले आहे. त्यामुळे एकप्रकारे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सोमवार (दि.०७ ऑक्टोबर) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश करुन तुतारी हातात घेतली. सोमवारी इंदापूरमध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेश कार्यक्रम प्रसंगी मंचावर राष्ट्रवादीचे सर्वासर्वे शरद पवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिय सुळे, खासदार अमोल कोल्हे, विजयसिंह मोहिते पाटील आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग

Post a Comment

Previous Post Next Post