कर्जत तहसिल कार्यालयात जप्त वाळू साठ्याचा लिलाव

कर्जत तहसिल कार्यालयात जप्त वाळू साठ्याचा लिलाव
 
इच्छुकांनी अनामत रक्कम भरुन लिलावात सहभागी व्हावे
 
| अहमदनगर | दि.07 ऑक्टोबर 2024 | कर्जत तालुक्यात वेगवेगळया ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या ३२३.२५ ब्रास वाळू साठ्यांचा लिलाव अटी व शर्तीच्या अधिन राहुन ११ ऑक्टोबर, २०२४ रोजी सायं. ४ वाजता तहसिल कार्यालय, कर्जत येथे आयोजित करण्यात आला आहे. 
 
इच्छुकांनी अनामत रक्कम भरुन लिलावात सहभागी होण्याचे आवाहन तहसिलदार गुरु बिराजदार यांनी केले आहे. लिलावाच्या अटी व शर्ती तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, कर्जत येथे उपलब्ध असल्याचेही कळविण्यात आले आहे. 

 

Post a Comment

Previous Post Next Post